Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा

Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.

Updated: Dec 12, 2022, 01:44 PM IST
Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा title=
Maha Samruddhi Nagpur Pune Highway Nagpur Goa Highway nitin gadkaris and devendra fadanvis big announcement nmp

Nagpur Pune Highway : मोदी सरकारने महाराष्ट्रात मिशन महा समृद्धी हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये बहुप्रतिक्षित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण झाले. आता लवकरच अजून दोन महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा असं या महामार्गाची रुपरेषा आहे. 

नितीन गडकरींची मोठी घोषणा 

नागपूर मुंबईतील 16 तासांचं अंतर आता 8 तासांवर येणार आहे. तसंच नागपूरपासून पुणे हे शहर 17 तासांवर आहे. अशात नागपूर पुणे एक्स्प्रेस वेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या महामार्गामुळे नागपूर पुणे या शहरातील अंतर अवघ्या 6 तासावर येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 

नागपूर ते मुंबई, नागपूर ते पुणे नंतर आता...

नागपूर मुंबई आणि नागपूर पुणे या शहरातील अंतर कमी होणार आहे. यासोबत आता नागपूर ते गोवामधील अंतर कमी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केल्या घोषणेनुसार पुढच्या टप्प्यात नागपूर ते गोवा अशाप्रकारचा महामार्ग होणार आहे. या महामार्गामुळे गोवा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते थेट गोवा असा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे.

6 महामार्गांची घोषणा 

राज्यात लवकरंच विविध जिल्ह्यांना जोडणारे सहा महामार्ग तयार केले जाणार असल्याची घोषणी आहे. यात औरंगाबाद ते पुणे महामार्ग, सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-सोलापूर-बंगळुरु-त्रिवेंद्रम-चेन्नई-हैदराबाद असाही एक साऊथमध्ये जाणारा महामार्ग, इंदूर-हैदराबाद, हैदराबाद- रायपूर, नागपूर-विजयवाडा, पुणे-बंगळुरु, या महामार्गांचा समावेश आहे.