नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम

 आता बातमी स्त्रीशक्तीची प्रचिती देणारी. नक्षलग्रस्त भागांमध्ये आता महिला कोब्रा कमांडोंची पथकं (Squad of female  CoBRA commandos) तैनात केली जाणार आहेत. 

Updated: Feb 6, 2021, 08:14 PM IST
नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम    title=

मनिष शुक्ला, गुरूग्राम : आता बातमी स्त्रीशक्तीची प्रचिती देणारी. नक्षलग्रस्त भागांमध्ये (anti-Naxal operations grid) आता महिला कोब्रा कमांडोंची पथकं (Squad of female  CoBRA commandos) तैनात केली जाणार आहेत. देशातल्या पहिल्या 'क्वीन कोब्रां'चं (female commando force CoBRA) खडतर ट्रेनिंग सध्या सुरू आहे. बघुयात झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट.   

छत्तीसगड आणि ओडिशाच्या जंगलांमध्ये नक्षलवाद्यांशी दोन हात करायला देशातील पहिली महिला कोब्रा कमांडो टीम सज्ज होत आहे. आतापर्यंत CRPFच्या कोब्रा कमांडो पथकात केवळ पुरूष जवान असायचे. पहिल्यांदाच महिला सैनिकांचं पथक तयार करण्यात आलंय. या पथकाचं कठोर प्रशिक्षण सध्या सुरू आहे. 

AK 47, AK 56 रायफल्स हाताळण्याबरोबरच अत्यंत खडतर परिस्थितीत लढण्यासाठी या कमांडोना तयार करण्यात येतंय. तब्बल 12 दिवस काहीही न खाता या जंगलामध्ये राहू शकतील, अशा पद्धतीनं त्यांना ट्रेन केलं जात आहे.

जंगलांमध्ये लढण्यासाठी आवश्यक असलेला गनिमी कावाही या कमांडोंना शिकवला जातोय. त्यांचा जोश कायम आहे. CRPFकोब्रा कमांडो झोया नाईक आणि उज्ज्वला इस्लाम यांनी आम्हाला याचा अभिमान आहे, असे म्हटले आहे.
 
सध्या CRPFच्या 34 महिलांची ही कोब्रा कमांडो टीम तयार केली जातेय. येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा 100वर नेण्यात येईल. गुरूग्रामच्या अकादमीमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर हे पथक छत्तीसगड आणि ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागात तैनात होईल.