'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

Updated: Oct 9, 2017, 10:49 PM IST
'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात' title=

नवी दिल्ली : देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. प्रत्येक राज्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत काय नियमावली केली याची माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

तसंच देशातील कोणत्याही शाळेत मुलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ देऊ नका अशा सूचनाही न्यायालयानं दिल्यात. गुरूग्राममधल्या शाळेत प्रद्युम्न ठाकूर याची हत्या करण्यात आली होता. त्यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिलेत.