वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाडीवर बसून, तरुणाची हजारो फुट उंचावरुन उडी आणि...

आज कालच्या तरुणांना साहस दाखवणारं काम करण्याची क्रेझ वाढली आहे. ज्यामुळे ते असं काही करु दाखवण्यासाठी पुढे येतात.

Updated: Apr 14, 2022, 04:53 PM IST
वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाडीवर बसून, तरुणाची हजारो फुट उंचावरुन उडी आणि...  title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही व्हिडीओ किंवा कन्टेन्स पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, टेक, सायन्स, क्राफ्ट सारखे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. एवढंच काय तर येथे आपल्यासमोर असे व्हिडीओ येतात, जे आपल्या अंगावर काटा आणतात. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज कालच्या तरुणांना साहस दाखवणारं काम करण्याची क्रेझ वाढली आहे. ज्यामुळे ते असं काही करु दाखवण्यासाठी पुढे येतात. जे आजपर्यंत कोणीच केलं नसेल.

असंच साहस या तरुणाला करुन दाखवायचं आहे. ज्यामुळे त्यांने वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गाडीवरुन थेट का उंच ब्रिजवडून उडी घेतली आणि खाली गेल्यावर आपलं पॅराशूट उघडलं आणि सेफ लॅन्डिंग केली. तरुणाचा हा संपूर्ण प्रकार एका व्हिडीओ कैद झालेला आहे, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता luxuriateworld नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमधील हा तरुण स्टंट करत आहे आणि त्यासाठी त्याने संपूर्ण काळजी देखील घेतली आहे. परंतु असं असलं तरी धावत्या गाडीतून अशी उडी मारणं फारच जोखमीचं ठरु शकलं असतं. परंतु या व्यक्तीचं नशीब फार चांगलं आहे. त्याने यासाठी बरीच तयारी केली असावी. त्यामुळे तुम्हाला कितीही वाटलं तरी, या तरुणाला कॉपी करण्याचं धाडस करु नका.