Shocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि...

Awareness Video: तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार...  

Updated: Oct 16, 2022, 08:34 AM IST
Shocking Video : ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन, गर्लफ्रेन्डच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि... title=
man molestation with girlfriend Shocking video on Social media nmp

Lovers in Coffee Shop Video: आजकाल मुलामुलींची मैत्री (friendship) खूप सहज होते. आपण आपल्या आजूबाजूला अनेक पोरापोरींचा घोळका पाहिला असेल. पण मुलींना घरातून कायम सांगितलं जातं जग खूप वाईट आहे, म्हणून सहज कोणावर विश्वास ठेवू नको. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे. तो पाहून कोणावर मैत्रीवरील विश्वास उडतो. प्रत्येक तरुणींनी आणि महिलांनी (girls and women) नक्की एकदा हा व्हिडीओ बघावा. 

ज्याचावर प्रेम केलं तो निघाला व्हिलन

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता एक तरुण आपल्या मैत्रिणीला कॅफेमध्ये (Cafe) घेऊन येतो. तिथे हे दोघे कॉफीची (Coffee) ऑर्डर देतात. ती मुलगी फ्रेश होण्यासाठी आत जाते. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण तिच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध (gungi medicine) मिसळतं...ज्या तरुणावर विश्वास ठेवून ही तरुणी आली होती. पुढच्या क्षणी तिच्या सोबत आयुष्यात काय होणार याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. ज्याच्यासोबत प्रेमाचे (love) स्वप्न रंगोली आणि आयुष्याचा विचार केला त्याने मात्र मनावर नाही तर शरीरावर प्रेम केलं. अशा विकृत (molestation) विचारांच्या लोकांमुळे समाजात इतर पुरुषांवरही विश्वास बसायला वेळ लागतो. (man molestation with girlfriend Shocking video on Social media nmp)

अशी पण एक बाजू, जर तो नसता तर...

या व्हिडीओमध्ये पुढे तुम्ही पाहू शकता, कॅफेमधील सर्व्हिस बॉय (Service Boy) त्या तरुणाचं हे कृत्य पाहतो आणि तो ताबडतोब पोलिसांना (police) फोन करतो. काही क्षणात या कॅफेत पोलीस अधिकारी दाखल होतात आणि या तरुणाचं धक्कादायक कृत्य तरुणीसमोर उघड पडतं. या जगात दोन प्रकारची माणसं असतात असं आपण कायम म्हणतो एक धोका देणारे तर एक संकटातून वाचविणारे...त्या कॅफेमधील सर्व्हिस बॉय देवदूत म्हणून आला आणि त्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचलं. 

सोशल मीडियावर समोर आला व्हिडीओ

खरं तर हा व्हिडीओ तरुणींमध्ये जनजागृती करण्यासाठी Awareness Video म्हणून सोशल मीडियाच्या यूट्यूबवर (YouTube) शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून मुलींमध्ये जनजागृती तर होतेच पण एक सकारत्मक गोष्ट म्हणजे समाजात वाईट प्रवृत्ती लोक असली तरी चांगली लोक सुद्धा आहेत.