Viral Video: 2 सेकंद उशीर झाला असता तर गेला असता मित्राचा जीव! घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Man Save Friend Life: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रस्त्याशेजारी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Updated: Mar 30, 2023, 03:23 PM IST
Viral Video: 2 सेकंद उशीर झाला असता तर गेला असता मित्राचा जीव! घटनाक्रम CCTV मध्ये कैद title=
Man Save Friend Viral Video (photo courtesy: screengrab)

Man Save Friends Life Video Goes Viral: सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. त्यामुळेच रोज रस्ते अपघातांच्या बातम्या समोर येत असतात. यापैकी अनेकदा वाहनचालकांची चूक असते तर कधीतरी रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांमुळे अपघातांना आमंत्रण मिळतं. या अपघातांमध्ये दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. मात्र अनेकदा चमत्कारिकरित्या या अपघातांमधून लोक वाचतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत आपल्या मित्राचा जीव वाचवला. 2 सेकंदांनी जरी उशीर झाला असता तरी या व्यक्तीचा जीव गेला असता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ हाँ जरुरी है नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं स्पष्ट होत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत. या रस्त्याच्या कडेने दोघेजण चालताना दिसत आहेत. हे दोघे मित्र गप्पा मारत चालेले असतानाच बाजूने वेगात जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या ट्र्कच्या मागच्या बाजूला असलेला कंटेनर कोसळला. मात्र हा कंटेनर रस्त्याने चालत असलेल्या या दोघांवर पडणार होता. त्यावेळी रस्त्याच्या आतल्याबाजूने चालणाऱ्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखलं अन् तो स्वत: बाजूला सरला. इतकेच नाही तर त्याने कंटेनर पडतोय हे पाहून आपल्या मित्राच्या हाताला पकडून त्याला जोरात खेचलं. त्यामुळे हा कंटेनर जिथे पडला तिथून अवघ्या काही क्षण आधी हे दोघे बाजूला झाले. अवघ्या 2 सेकंदांचा उशीर झाला असता तरी रस्त्याच्या बाजूने चालणारी ही व्यक्ती कंटेरनखाली अडकली असती आणि ते तिच्या जीवावरही बेतलं असतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओलाही मैत्रीच्या अर्थाने कॅप्शन देण्यात आलेली. "असा सक्रीय मित्र सर्वांकडे असला पाहिजे," अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वच स्तरामधून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्यक्तीने स्वत:वरील संकट तर दूर केलं तसेच मित्राचेही प्राण वाचवल्याचं पाहून अनेकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.