मोदीजी जो सल्ला मला दिला, तो स्वत: अंमलात आणा - मनमोहन सिंह

 उन्नाव आणि कठुआ प्रकरणारव मोदी काही थोडेफार बोलले आहेत. त्याबद्धल अभिनंदन पण, तेवढे बोलणे पुरेसे नाही, असेही मनमोहनसिंह यांनी म्हटले आहे. 

अण्णासाहेब चवरे & Updated: Apr 18, 2018, 07:43 PM IST
मोदीजी जो सल्ला मला दिला, तो स्वत: अंमलात आणा - मनमोहन सिंह title=

नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणावरून देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. या दोन्ही प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी बाळगलेल्या मौनावर आपल्या खास शब्दांत टीका करताना, 'मोदीजी यापूर्वी आपण मला जो मौन सोडण्याचा सल्ला दिला तो स्वत:च आमलात आणा', असे मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, उन्नाव आणि कठुआ प्रकरणारव मोदी काही थोडेफार बोलले आहेत. त्याबद्धल अभिनंदन पण, तेवढे बोलणे पुरेसे नाही, असेही मनमोहनसिंह यांनी म्हटले आहे. 

मोदीजी, दुसऱ्यांना दिलेला सल्ला स्वत: पाळा

डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील शेवटच्या वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक नेता त्यांच्यावर गंभीर प्रकरणावर गप्प राहात असल्याचा आरोप करत होते. 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. मनमोहन सिंह यांनी याच मुद्द्यावरून मनमोहन सिंह यांनी मोदींवर पलटवार केला आहे. मोदींसह भाजपचे सर्ऱ्हास नेते मनमोहन सिंह यांचा 'मौन मोहन सिंह' असा उल्लेख करत असत. यावर बोलताना मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे की, आयुष्यातील बराच काळ आपण अशा प्रकारची टीका सहन करत आलो आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सल्ला देत होते. पण, त्यांनी स्वत:च हा सल्ला आमलात आणायला हवा. प्रसारमाध्यमांतील वृत्तामधून मला कळायचे की, माझ्या न बोलण्याबद्धल ते माज्यावर नेहमी टीका करायचे. पण, मला वाटते की, आता त्यांनी स्वत:च बोलण्याची गरज आहे. पण, मला आनंद आहे की, या आधी थोडेसे का होईना पंतप्रधान या दोन्ही प्रकरणांवर बोलले.

मोदींच्या मौनामुळे समर्थकांमध्ये चुकीचा संदेश

हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगतानाच डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यानी असा घटनांवर दीर्घकाळ मौन बाळगल्यामुळे असे कृत्य करणाऱ्या लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपलया या कृत्यावर विरूद्ध काहीही कारवाई होणार नाही असे त्यांना वाटते, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, 'मला वाटते की, जे ऑथिरिटमध्ये आहेत त्यांनी वेळ येताच अशा प्रकरणांवर बोलले पाहिजे. जेणेकरून समर्थकांना संदेश गेला पाहिजे.' 

कठुआ आणि उन्नाव प्रकरणी काय म्हणाले मोदी?

उत्तर प्रदेशातील कठुआ आणि जम्मू-काश्मीर येथील उन्नाव मधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले आहे. देशभरातील विरोधाची धार तीव्र झालेली पाहून पंतप्रधानांनाही या विषयावरचे आपले मौन सोडत भाष्य केले. गेले दोन दिवस ज्या घटना चर्चेत आहेत त्या सभ्य समाजाला शोभणाऱ्या नाहीत. हे अत्यंत निंदनीय आहे. एका समाजाच्या, देशाच्या रूपात या घटना आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे. देशात होणाऱ्या कोणत्याही राज्यातील परिसरातील अशा घटना मानवी संवेदनांना आव्हान देतात. पण, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो न्याय मिळेल, संपूर्ण न्याय मिळेल. आमच्या कन्यांना न्याय मिळेल. समाजातील वाईट गोष्टी संपविण्यासाठी आपणा सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल.