मराठी भाषेला अच्छे दिन, तिसऱ्या स्थानावर झेप

देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत हिंदी, बंगालीनंतर मराठीचा तिसरा क्रमांक लागतो.

Updated: Jun 27, 2018, 05:00 PM IST
मराठी भाषेला अच्छे दिन, तिसऱ्या स्थानावर झेप title=

नवी दिल्ली : देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. हिंदी ही अव्वल आहे. तर बंगाली ही दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशात झालेल्या जनगणेच्या सर्वेक्षणात मराठी ही हिंदी आणि बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याची माहीती पुढे आली आहे. 

देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे. २०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आलेय. मराठी भाषा ही जगात १८ क्रमांकावर आहे. तर भारतातील आता तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकृत भाषा मराठी आहे. मराठी ही राज्यभाषा आहे.

हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८. १ टक्क्यांवरुन ८. ३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण ७. १९ टक्क्यांवरुन ६. ९३ टक्क्यांवर घसरले आहे. 

भारतातील २२ अनुसूचित भाषामध्ये समाविष्ट असणाऱ्या संस्कृत भाषेला उतरती कळा आली आहे. फक्त २४,८२१ लोकांची बोलीभाषाही संस्कृत आहे. यापाठोपाठच, बोडो, मणिपुरी, कोकणी, डोंगरी या भाषांचाही समावेश होतो. मात्र इंग्रजीने आपला दबदबा कायम ठेवलाय. साधारणपणे, २.६ लोकांची प्रथम भाषा इंग्रजी आहे. ज्यातील १.६ लाख भाषिक हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यानंतर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तर केरळ हे अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानमध्ये १.०४ करोड भाषिक हे भिल्ली, भिलौडी भाषा बोलतात तर, गोन्डी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २९ लाख आहे.