उत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम

उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली. 

Updated: Aug 10, 2017, 11:53 PM IST
उत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम  title=

नवी दिल्ली : उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली. 

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 267 अंशांनी आपटला, तर निफ्टी 9 हजार 900 अंशांच्या खाली घसरला. दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीचे भाव मात्र कडाडलेत. 

नवी दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचा दर 340 अंशांनी वाढून दोन महिन्यांतल्या उच्चांकावर गेलाय. चांदीच्या दरात 570 रुपयांची वाढ झाली.