दिल्ली महापौर निवडणुकीतून भाजपची माघार, 'आप'च्या शैली ओबेरॉय महापौर

MCD Mayor Election 2023 :  दिल्लीत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, अचानक माघार घेतली.

Updated: Apr 26, 2023, 03:55 PM IST
दिल्ली महापौर निवडणुकीतून भाजपची माघार, 'आप'च्या शैली ओबेरॉय महापौर  title=

MCD Mayor Election 2023 : दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीने आपली सत्ता असल्याचे दाखवून दिले आहे. दिल्ली महापौर निवडणुकीत भाजपने माघार घेतली. त्यामुळे 'आप'  मार्ग मोकळा झाला. भाजपच्या माघारीमुळे दिल्लीच्या महापौरपदी डॉ. शैली ओबरॉय, तर उपमहापौरपदी आले मोहम्मद इकबाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दिल्लीत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र,  महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या महापौरपदाच्या उमेदवार शिखा राय आणि उपमहापौरपदाच्या उमेदवार सीमा पांडे यांची नावे मागे घेतली. भाजपने महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार डॉ. शेली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सर्व प्रयत्न करुनही आम आदमी पक्षाने कायमस्वरुपी समित्या आणि प्रभाग समित्या स्थापन करण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच त्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेत कोणतेही काम होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेवक आणि महापौरपदाच्या उमेदवार शिखा राय म्हणाल्या की, ज्या नगरसेवकांना मला मत द्यावे लागले त्यांची मी माफी मागते. त्याचे अनेक आभार. भाजपच्या या खेळीमुळे दिल्लीच्या महापौरपदी डॉ. शैली ओबेरॉय, तर उपमहापौरपदी आले मोहम्मद इक्बाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय आणि भारतीय जनता पक्षाच्या शिखा राय यांच्यात थेट लढत असल्याचे मानले जात होते. 26 एप्रिल रोजी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान महापौर ओबेरॉय आणि भाजपच्या शिखा राय यांच्यासह दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली.

शैली ओबेरॉय यांची 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत शैलीला 150 मते मिळाली, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना 116 मते मिळाली. दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता आहे.तर दिल्ली राज्यातही त्यांचेच सरकार आहे. भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करण्यास मोठी झगडावे लागत आहे. मात्र, सत्तेच्या जवळ जाण्यास  'आप'ने रोखले आहे.