गाढवपणा करणाऱ्या तरुणाला गाढवानेच शिकवला धडापाहा व्हिडीओ

हम भी कम नही! लाथा मारणाऱ्या तरुणाला गाढवानं शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

Updated: Jul 30, 2022, 08:18 PM IST
गाढवपणा करणाऱ्या तरुणाला गाढवानेच शिकवला धडापाहा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ फिरतात. काही मनोरंजन करतात तर काही डोळ्यात अंजन घालणारे असतात. बऱ्याचदा प्राण्यांना त्रास देणारी व्हिडीओ आपल्या समोर येतात. प्राण्यावर जीव लावला तर प्राणी कधीच तुम्हाला सोडून जात नाही. पण त्याला त्रास दिला तर तो अद्दल घडवल्याशिवाय शांत बसत नाही. हे प्रत्यक्षात दाखवून देणारा एक व्हिृडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक तरुण गाढवाला लाथा-बुक्क्या मारत आहे. हा तरुण गाढवाच्या तोंडावर जोरात लाथा मारत आहे. गाढवाला पकडून त्याला मारहाण करत आहे. त्याचा अमानुषपणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाढव सुरुवातीला काहीच करत नाही. 

जेव्हा तरुण गाढवावर बसायला जातो तेव्हा मात्र गाढव त्याला अद्दल घडवायचं ठरवतो. हा तरुण त्याच्यावर बसताच गाढव तोंडाने त्याचा पाय पकडतं आणि त्याला खाली पाडून फरफटत घेऊन जातो. 

या तरुणाने जे केल त्याची अद्दल गाढव अशी घडवतो की तरुण आयुष्यभर हे विसरणार नाही. हा व्हिडीओ कुठला आहे त्याची माहिती मिळू शकली नाही. तो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. तरुणाच्या कर्माची फळ, तर काही युजर म्हणाले त्याला अद्दल घडली ते बरं झालं. अनेक युजरनी या तरुणाच्या कृत्याचा निषेध केला आहे.