बॉडी बिल्डिंगमध्ये डझनभर पुरस्कार, मिस्टर इंडियाचा खिताब... 42 व्या वर्षात 'या' कारणाने मृत्यू

Premraj Arora Death: लहानपणापासून बॉडिबिल्डिंगची आवड त्याने जोपासली, राज्यासाठी आणि देशासाठी अनेक पुरस्कार त्याने जिंकले, पण वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षात त्याचा धक्कादायक मृत्यू झाला.

राजीव कासले | Updated: May 24, 2023, 07:58 PM IST
बॉडी बिल्डिंगमध्ये डझनभर पुरस्कार, मिस्टर इंडियाचा खिताब... 42 व्या वर्षात 'या' कारणाने मृत्यू title=

Premraj Arora Death: गेल्या एक ते दोन वर्षात ह्दयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने मृत्यू होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तरुण मुलांपासून वयोवृद्धांचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. इतकंच काय कोणतेही व्यसन नसणारे किंवा तब्येतीने तंदरुस्त असणाऱ्या लोकांनाही मृत्यने गाठल्ं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध बॉडिबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया (Mr. India) बॉडिबिल्डर प्रेमराज अरोरा (Premraj Arora Death) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. 

42 वर्षांचा प्रेमराज आपली दैनंदिन कामं आटपून बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेला. पण बराच वेळ झाल्यानंतरही प्रेमराज बाथरुममधून बाहेर आला नाही. काही वेळाने घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरचे घाबरले. त्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी बाथरुममध्ये प्रेमराज बेशुद्ध अवस्थेत पडला होता. कुटुंबियांना तात्काळ प्रेमराजला रुग्णलयात दाखल केलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. ह्रदयविकाचा तीव्र झटका आल्याने प्रेमराज अरोराचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

प्रेमराजला लहानपणापासून व्यायामाची आवड होती. 2012-13 मध्ये त्याने राजस्थानचा (Rajasthan) पॉवर लिफ्टिंग पुरस्कार पटकावला होता. 2014 मध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर इथं आयोजितकरण्यात आलेल्या बॉलिबिल्डिंग स्पर्धेत त्याने मिस्टर इंडियाचा खिताब आपल्या नावावर केला. तर 2016 आणि 2018 मध्ये त्याने मिस्टर राजस्थानचा पुरस्कार जिंकला. तरुण मुलांसाठी तो आदर्श होता. अनेक तरुणांना त्याने व्यायामाचं प्रशिक्षण दिलं. आपल्या तब्येतीबाबत प्रेमराज प्रचंड जागरुक होता. इतकंच काय तर त्याला कोणतंही व्यसन नव्हतं. 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
हृदयाशी संबंधित समस्या या खूप गंभीर असतात. हृदयविकार (Heart Attack) काहीवेळी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्या आजाराकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. छातीत तीव्र वेदना होणं, डोकेदुखी ही लक्षणं (Heart Attack Symptoms) बऱ्याचदा संभ्रम निर्माण करतात, ही लक्षण पोटातील गॅसशी संबंधित आहे की हृदयविकाराशी यात अनेकवेळा गोंधळ उडतो.  मात्र याशिवाय हार्ट अटॅकची अन्य काही लक्षणे असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे, कुटुंबात हृदयविकाराची पार्श्वभूमी आहे किंवा ज्या लोकांना जास्त वेळ बसून कामे करावे लागतात अशा लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात असतो असं डॉक्टर सांगतात.