भाजपाची 'समृद्ध अडगळ'

भारतीय जनसंघ ते सत्ताधारी भाजपा या प्रवासातील मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी सुमित्रा महाजन हे तीन नेते.

Updated: Apr 6, 2019, 11:30 AM IST
भाजपाची 'समृद्ध अडगळ'  title=

मुंबई : भारतीय जनसंघ ते सत्ताधारी भाजपा या प्रवासातील मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी सुमित्रा महाजन हे तीन नेते. आतापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाचे शिलेदार आहेत. बहुमतातील भाजपा सरकार २०१४ साली सत्तेत झाले. भाजपाचे सरकार आल्याच्या पाच वर्षांनी पक्षाने या तिनही बड्या नेत्यांना बाजूला सारले. सर्वप्रथम मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि आता सुमित्रा महाजन. एकापाठोपाठ एक या तिनही नेत्यांचे तिकीट कापले गेले. इंदूरमध्ये भाजपाने तिकीटाचा जो घोळ घातला, त्यामुळे तब्बल सात वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या सुमित्रा महाजनांना मी निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाला कळवण्याची वेळ आली. 

निवडणूक न लढवण्याबाबत बोलताना सुमित्रा महाजन यांनी मी अतिशय विचार करून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले. एखाद्याला चिंतेतून मुक्त करावे त्याप्रमाणे मी पक्षाला चिंतामुक्त केले असून मला याबाबत कसे वाटेल त्याचा विचार करू नका. निर्णय घेण्यासाठी जर कोणत्याही कारणाने संकोच वाटत असेल तर मी माझ्याकडून कोणताही संकोच करू नका असे सांगत पुढे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सुमित्रा महाजन १९८९ पासून सलग सात वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. लोकसभा अध्यक्ष म्हणून अत्यंत सक्षमपणे त्यांनी भूमिका निभावली. पक्षाच्या निष्ठावंत आणि सगळ्यांशी मिळून मिसळून काम करणाऱ्य़ा अशी त्यांची ओळख आहे. अडवाणींनी लिहिलेल्या ब्लॉगच्या दुसऱ्याच दिवशी सुमित्रा महाजनांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.