दिल्लीमध्ये तीन बहिणींचा भूकबळीने मृत्यू

 प्राथमिक शवविच्छेदन अहवालात भूकबळीने हा मृत्यू झाल्याचे समोर आलंय.

Updated: Jul 26, 2018, 09:21 AM IST
दिल्लीमध्ये तीन बहिणींचा भूकबळीने मृत्यू  title=

नवी दिल्ली : दिल्लीतील मंडावली क्षेत्रात ३ बहिणी मृतावस्थेत आढळल्या. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात भूकबळीने हा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. यानंतर दिल्ली सरकारने याप्रकरणी मॅजस्ट्रिक तपास करण्याचे आदेश दिलेयंत. या तिघींचे वय अनुक्रमे दोन, चार, आठ वर्षे होतं. मंगळवारी दुपारच्या वेळेस आई आणि एक मित्र त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी पोलिसांना मुलींच्या मृत्यूविषयी माहिती दिली. जीटीबी हॉस्पीटल डॉक्टरांच्या टीमने पुन: परिक्षण केल्याचे पोलीस उपायुक्त पंकज सिंह यांनी सांगितले.

वडिल बेपत्ता 

मुलींचा मृत्यू कुपोषण किंवा भुकमारीने आणि संबंधित त्रासाने झाल्याचे प्रारंभिक शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. जिथे हे कुटुंब राहायचे तिथली तपासणी फॉरेंसिक टीमने केल्यानंतर त्यांना औषध, गोळ्या सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलींचे वडिल रोजमदारीच काम करतात आणि ते मंगळवारपासून बेपत्ता आहेत. ते कामाच्या शोधात बाहेर पडले असून काही दिवसांत परततील असं स्थानिकांच म्हणणं आहे. गेल्या आठवड्यातच हा परिवार इथे आला होता आणि त्यांच्याशी आमचा जास्त संवाद नव्हता असेही त्यांनी सांगितले. 

उप मुख्यमंत्र्यांचे ट्विट

मुलींच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे निशाण नाही. सुरूवातीला हे प्राकृतिक वाटलं पण औषधांच्या बॉटल दिसल्याने यामध्ये कोणतं कारस्थान नसावं याचा पोलीस तपास घेत असल्याचे ट्विट दिल्ली उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलंय. मुलींचे वडिल भाड्याने रिक्षा चालवत पण काही दिवसांपूर्वी रिक्षा चोरीला गेल्यानंतर मित्राला घेऊन याठिकाणी आला. मित्रानेच त्याला राहण्यास जागा दिली.मोठी मुलगी शाळेत गेली होती. पोलीस या सर्व प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

'मुलींची तब्ब्येत ठिक नव्हती पण त्यांना काय झालंय ? मृत्यू कसा झाला ? याबद्दल माहीती नाही तसेच मुलींच्या आईचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे' त्यांना हॉस्पीटलमध्ये घेऊन आलेल्या मित्राने सांगितले.