'अविश्वास ठरावा'ला मात दिल्यानंतर मोदी-शाह म्हणतात...

मोदी सरकारविरोधातला विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळण्यात आलाय

Updated: Jul 21, 2018, 08:47 AM IST
'अविश्वास ठरावा'ला मात दिल्यानंतर मोदी-शाह म्हणतात...  title=

नवी दिल्ली : अविश्वास प्रस्ताव जिंकल्यावर काही क्षणांतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी प्रतिक्रिया दिलीय. आमच्याकडे केवळ सभागृहाचाच नव्हे तर १२५ कोटी जनतेचाही विश्वास आहे... आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार... अशी विजयी प्रतिक्रिया दिली. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अविश्वास प्रस्ताव जिंकल्यावर अमित शाह यांनीही ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 'जनतेच्या विश्वासावर अविश्वास दाखवणाऱ्यांचा आज लोकसभेत पराभव झाला ती २०१९ लोकसभा निवडणुकींच्या निकालाची एक झलक आहे. अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारचा विजय लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव आहे' असं अमित शाह यांनी म्हटलंय.    

लोकसभेत विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने १२६ जणांनी तर विरोधात ३२५ मते मिळाल्याने मोदी सरकारविरोधातला विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. तेलुगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आला होता. विरोधकांच्या टिकेचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भाषणात त्यांनी गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडलं.