बाबा राम रहीमला भेटण्यासाठी आई नसीब कौर तुरूंगात

बाबा राम रहीम यास भेटण्यासाठी त्याची आई नसीब कौर यांनी तुरूंगात हजेरी लावली. राम रहीम तुरूंगात गेल्यापासून त्याला भेटण्यास आलेल्या नसीब कौर या पहिल्याच व्यक्ती आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 14, 2017, 09:05 PM IST
बाबा राम रहीमला भेटण्यासाठी आई नसीब कौर तुरूंगात

नवी दिल्ली : बाबा राम रहीम यास भेटण्यासाठी त्याची आई नसीब कौर यांनी तुरूंगात हजेरी लावली. राम रहीम तुरूंगात गेल्यापासून त्याला भेटण्यास आलेल्या नसीब कौर या पहिल्याच व्यक्ती आहेत.

बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यावर बाबा राम रहीमची रवानगी तुरूंगात करण्यात आली. दरम्यान, बाबा राम रहीमने स्वत: भेटण्यासाठी १० लोकांची नावे तुरूंग प्रशासनाला दिली होती. त्या १० नावांमध्ये आई नसीब कौर यांच्या नावाचाही समावेश आहे.

राम रहीमची आई त्याला भेटण्यास आली तेव्हा तुरूंग अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. नसीब कौर या गाडी चालक इकबाल सिंह याच्यासोबत राजस्थानचा परवाना असलेल्या गाडीतून राम रहीम यास भेटण्यास आल्या. नसीब कौर या राम रहीमचे कपडे सोबत घेऊन आल्या होत्या. दै. पंजाब केसरीने याबाबत वृत्त दिले आहे.