'....तर देशातील सर्व लोकसंख्येला Coronavirus वरील लसीची गरज नाही'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती उघड

Updated: Dec 1, 2020, 06:25 PM IST
'....तर देशातील सर्व लोकसंख्येला Coronavirus वरील लसीची गरज नाही'  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : जवळपास वर्षभरापासून संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोनाव्हायरस या विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी म्हणून जगातील अनेक आरोग्य संस्था प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. काही चाचण्यांतून सकारात्मक निकालही हाती आले आहेत. असं असतानाच आता भारतातही लस कोणाला देण्यात येणार याबातच्या अनेक चर्चा रंगू लागल्या. 

आरोग्य कर्मचारी, पोलीस अशा अनेक घटकांची चर्चा सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्रालयाकडून अखेर कोरोना लसीकरणाबाबतची अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. 

मंगळवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेतून याबाबतची माहिती देण्यात आली. आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीकरण हे लसीच्या कार्यक्षमतेवर आधारित असेल. 'कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याला आमचं प्राधान्य असेल. जर आम्ही गंभीर रुग्णांना लस देऊन ही साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर देशातील सर्वच लोकसंख्येला लसीकरणाची गरज लागणारही नाही', असं ते म्हणाले. 

संपूर्ण देशातील लोकसंख्येला लस मिळणार? 

संपूर्ण देशातील जनतेला कोरोनावरील लस मिळण्यास नेमका किती कालावधी लागेल असा प्रश्न असला आरोग्य सचिवांनी याबातही अत्यंत महत्त्वाची बाब स्पष्ट केली. 

 

'मी एक स्पष्ट करू इच्छितो की, संपूर्ण देशात लसीकरण करण्याबाबत शासन कधीच बोललं नव्हतं. अशा प्रकारची माहिती आपण आकडेवारीवर आधारित माहिती हाती असल्यावरच चर्चेत येणं महत्त्वाचं आहे'.