जम्मू-काश्मीरमध्ये नक्षलवाद्यांचं जाळं उभारायला सुरुवात

धक्कादायक माहिती आली समोर

Updated: Aug 29, 2018, 04:01 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये नक्षलवाद्यांचं जाळं उभारायला सुरुवात title=

श्रीनगर : नक्षलवादी संघटनांनी आता जम्मू काश्मीर राज्यात आपलं जाळं उभारालायला सुरूवात केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दहशतवादी संघटना आणि नक्षलवादी संघटना यांच्यात साटंलोटं असल्याची खळबळजनक माहिती सुरक्षा यंत्रणातल्या सूत्रांच्या हवाल्याने झी मीडियाच्या हाती लागली आहे.

यावर्षी मे महिन्यात जम्मू काश्मीरच्या अनेक भागात नक्षली समर्थकांच्या १५ जणांच्या तुकडीने भेटी दिल्याची माहिती आहे. अनंतनाग, बारामुल्ला, बडगाम, कुपवाडा आणि शोपियान या भागांचा या तुकडीने दौरा केला आहे. जून महिन्यात याबाबत झालेल्या पहिल्या अटकेनंतर एकेक माहिती बाहेर येत आहे. ताब्यात घेतलेल्या २२५ डॉक्युमेंट आणि २० टीबी डेटातून दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्यातल्या संबंधांबाबत पुष्टी मिळाली आहे.

अटक झालेला गौतम नवलखा हा या संबंधांमधला दुवा असल्याची चर्चा आहे. मे २०११ मध्ये गौतम नवलखा याला श्रीनगर एअरपोर्टवरून परत पाठवण्यात आलं होतं. गौतम नवलखामुळे काश्मीरतल्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो या कारणासाठी त्याला परत पाठवण्यात आलं होतं.