एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी नायडू आज दाखल करणार अर्ज

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

Updated: Jul 18, 2017, 09:20 AM IST
एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी नायडू आज दाखल करणार अर्ज title=

नवी दिल्ली : एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी उत्तरेतल्या राज्याला संधी दिल्यानंतर नायडूंच्या निमित्तानं भाजपनं दक्षिणेतल्या राज्याला संधी दिली आहे. 

नायडूंकडे सध्या केंद्रीय नगरविकास खात्याचा कार्यभार आहे. नायडूंच्या निमित्तानं भाजपनं अनुभवी राजकारणी मैदानात उतरवलाय. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

राज्यसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे... आणि २०१९ पर्यंत हे समीकरण बदलण्याची शक्यता नाही. त्यामुळं सरकारला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी भाजपला अनुभवी राजकारणी उमेदवार हवा होता. आता भाजपनं नायडूंच्या रूपानं यूपीएला आव्हान दिलंय. नायडू आणि यूपीएचे उमेदवार गोपाळ गांधी यांच्यात लढत रंगणार आहे.