'या' 3 कारणांसाठी कधीच वापरू नका Personal Loan ची रक्कम; संकटांमध्ये पडेल भर

Personal Loan : चुकूनही 'या' 3 कारणांनी तुम्ही Personal Loan ची रक्कम खर्च केलात तर संकटं वाढलीच म्हणून समजा   

सायली पाटील | Updated: May 17, 2024, 01:46 PM IST
'या' 3 कारणांसाठी कधीच वापरू नका Personal Loan ची रक्कम; संकटांमध्ये पडेल भर title=
never spend Personal Loan amount on these 3 places know details

Personal Loan : विविध कारणांनी घेतल्या जाणाऱ्या Personal Loan ची रक्कम खर्च करताना होणाऱ्या लहानसहान चुका कर्ज घेणाऱ्या व्यक्तीपुढं अनेक संकटं उभी करु शकतात. पर्सनल लोन किंवा खासगी कर्ज Emergancy Loan म्हणूनही ओळखलं जातं. हे कर्ज घेत असताना तुम्हाला कोलॅटरल जमा करावं लागत नाही, त्याशिवाय हे कर्ज अतिशय सहजगत्या उपलब्ध असतं. Personal Loan ची परफेड करण्यासाठी बँकेकडून पुरेसा वेळही दिला जातो. एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास आणि त्या व्यक्तीला गरज असल्याच बँकेकडून हे कर्ज लगेचच Approve केलं जातं. 

अनसिक्‍योर्ड लोनच्या श्रेणीत येण्याच्या कारणामुळं पर्सनल लोनवर असणारं व्याज तुलनेनं जास्त असतं. त्यामुळं काही गोष्टींवर या कर्जाची रक्कम खर्च करणं चुकीचा निर्णय मानला जातो. 

कोणत्या कामांसाठी वापरू नये पर्सनल लोनची रक्कम? 

कर्ज फेडण्यासाठी 

पर्सनल लोनचा व्याजदर अधिक असल्या असते. तुम्ही जर एखाद्या वक्तीकडून अमुक एक रक्कम कर्जाऊ घेतली असेल तर ती रक्कम फेडण्यासाठी खासगी कर्जाची रक्कम वापरणं योग्य निर्णय ठरत नाही. एकिकडे तुम्ही एक कर्ज फेडत असतानाच दुसरीकडे तुमच्या डोक्यावरचं कर्ज आणखी वाढत जातं हे सोपं समीकरण लक्षात ठेवणं महत्त्वाचं. 

चैनीच्या वस्तूंवर खर्च नको 

जेव्हा तुम्हाला पैशांची अधिकच चणचण भासेल तेव्हाच खासगी कर्जाचा पर्याय निवडणं योग्य निर्णय मानलं जातं. महागडा मोबाईल किंवा इतर कोणतीही महागडी, चैनीची वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा परदेशवारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोनची रक्कम खर्च करू नका असा सल्ला तज्ज्ञ देतात. 

हेसुद्धा वाचा : मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV

शेअरची खरेदी नकोच 

शेअर मार्केटचं संपूर्ण ज्ञान असेल तरच ही रक्कम इथं गुंतवणं शहाणपणाचं मानलं जातं. पण, शेअर मार्केटबाबत अधिक माहिती नसल्यास, कमी वेळात जास्त नफा कमवण्याच्या लालसेपोटी खासगी कर्जाची रक्कम इथं गुंतवू नका. इथं तोटा होऊ शकतो. शेअरमध्ये तोटा झाल्यास तुमची गुंतवणूक केलेली रक्कम व्यर्थ होऊ शकतो. त्यामुळं पर्सनल लोनवर असणारा अधिक व्याजदर तुमच्या डोकेदुखीचं कारण ठरून याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होऊ शकतो. ज्यामुळं तुम्हाला भविष्यात एखादं कर्ज घ्यायचं झाल्यास तुम्हाला याचा फटका बसू शकतो.