नवरीचा डान्स मंजुलिकालाही देतोय मात, डान्स पाहून सासरच्यांची लागली वाट

लग्न म्हटलं तर नाच गाण आलंच. या घटनेत नवरीला लग्नानंतर सासरच्यांनी नाचायला सांगितले. 

Updated: Jun 1, 2022, 09:32 PM IST
नवरीचा डान्स मंजुलिकालाही देतोय मात, डान्स पाहून सासरच्यांची लागली वाट  title=

मुंबई : लग्न म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र या घटनेत नवरीला लग्नानंतर सासरच्यांनी नाचायला सांगितले. नवरीने सर्वांना मान देत नाचायला सुरुवात केली. मात्र हा डान्स पाहून सर्वंच चक्रावले, काहींची तर पळता भुई थोडी झाली. या डान्सचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  

व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नानंतर सासरी एक फंक्शन सुरु असल्याचे दिसतेय. व्हिडिओत सासऱची ज्येष्ठ व तरूण मंडळी उपस्थित आहेत. संपुर्ण घर आनंदात न्हाऊन निघालं असताना या आनंदात आणखीण भर घालण्यासाठी नवरीच्या डान्सची मागणी होते. सासरची मंडळी नवरीला डान्स करण्याचा आग्रह करतात. 

नवरी नाचते की नाही याची कल्पना कोणालाच नव्हती. मात्र सर्वांना तिने नाचावी अशीच इच्छा होती. सासरच्या मंडळींचा मान राखत ती नाचली खरी. मात्र तिचा नाच पाहून सर्वांना भुल भुलैया चित्रपटातील मंजुलिकाची आठवण आली. हा व्हिडिओ पाहून सासरच्या मंडळींच्या पाया खालची जमीन सरकली.  

सोशल मीडियावर या व्हिडिओला खुप पसंत केले जात आहे. मात्र सासरचे नवरीवर फार रागावल्याचे कळते. नवरीचा हा डान्स पाहून अनेक नेटकरी तिची प्रशंसा करतायत. नवरीच्या डान्स हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.