धावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका

सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले.

Updated: Apr 24, 2023, 11:07 PM IST
धावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका title=

Flight Urination Case:  एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक प्रकार जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाच्या (Air-India flight) विमानामध्ये घडला होता. पॅरिस-दिल्ली (Paris-Delhi) विमानात एका प्रवाशाने दारुचे नशेत हे कृत्य केले होते. यानंतर असाच घाणेरडा प्रकार अमेरिकन एयरलाइनमध्ये देखील घडला आहे. न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट एका मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर विमान उतरताच या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने या घटनेबाबतचे वृत्त दिले आहे. हे कृत्य करणाऱ्या प्रवासी कोण आहे? तो कुठे राहतो याबाबतची माहिती समोर आलेली नाही. या प्रवाशाचा सह प्रवाशाची किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून त्याने सहप्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला.

फ्लाईटच्या क्रू मेंबरने याबाबत दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरील पोलिसांना याबाबतची माहिती. विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पोहचताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले. यानंर या मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशाची माफी मागितली. यानंतर पीडित प्रवाशाने तक्रार मागे घेत प्रकरणाला पूर्ण विराम दिला. 

एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका

6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या 142 या नंबरच्या फ्लाइटमध्ये (Air India flight 142) धक्कादायक प्रकार घडला होता. पॅरिस-दिल्ली (Paris-Delhi) विमानातील एका मद्यधुंद (alcohol) अवस्थेतील प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली होती. 

विमानात मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्यालाच जबरदस्ती किस केला

विमानात लघुशंका करण्याचे प्रकार घडत असतानाच आता भलताच प्रकार घडला आहे.  विमानात मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्यालाच जबरदस्ती किस केला आहे. न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार 10 एप्रिल रोजी मिनेसोटा येथील विमानात 61 वर्षीय फर्स्ट क्लास प्रवासी डेविन एलन बर्क यांनी पुरुष फ्लाइट अटेंडंटच्या गळ्यावर किस केला.  डेल्टा एअरलाइन्समध्ये हा प्रकार घडला आहे.