नवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू

Crime News In Marathi: नवविवाहेतेने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जे केलं त्यांनी एकच गदारोळ माजला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 19, 2024, 11:24 AM IST
नवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू title=
newlyweds death angry girls family burnt boys house in laws death

Crime News In Marathi: नवविवाहितेने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी रागाच्या भरात मुलीचे सासरच पेटवून दिले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, एकाच घरातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने गावात शोककळा पसरली आहे. 

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या मंडळीने तिच्या सासरी येऊन मोठा गोंधळ घातला. या घटनेत तिच्या सासू-सासऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तर, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

18 मार्च रोजी मुट्ठीगंज परिसरात नवविवाहिता आंशिका केसरवानी हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. आंशिकाचे अलीकडेच व्यापारी अंशुसोबत लग्न झाले होते. आंशिकाच्या मृत्यूची बातमी तिच्या घरी पोहोचताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केली. तिच्या घरुन मोठ्या संख्येने लोक तिच्या सासरी पोहोचले. तिथे तिच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये मोठे वाद निर्माण झाले. तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. 

आंशिकाचा सासरी छळ होत होता, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. याच आरोपांमुळं वातावरण अधिक पेटले. याच रागातून आंशिकाच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना घरात बंद करुन आग लावली. आग नंतर इतकी पसरली की संपूर्ण घराने पेट घेतला. या घटनेत दोन जणांचा म्हणजेच तिच्या सासू-सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

या प्रकरणात प्रयागराजचे डीसीपी दीपक भूकर यांनी म्हटलं आहे की, रात्री 11 वाजता खबर मिळाली की एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, घटनास्थळी सासर व माहेरच्या मंडळींमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर घटनास्थळी जेव्हा पोलिस पोहोचले तेव्हाही हा वाद सुरूच होता. त्याचवेळी माहेरच्या मंडळींनी विवाहितेच्या सासरच्या लोकांना एका घरात बंद करुन घराला आग लावली. पोलिसांनी लगेचच कारवाई करत 5 जणांना बाहेर काढले व अग्निशमन दलाला सूचना दिली. 

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर रात्री 3 वाजता सर्व घराची झडती घेतल्यानंतर तिथे दोन मृतदेह सापडले. त्यातील एक मृतदेह राजेंद्र केसरवानी यांचा आहे जे नवविवाहितेचे सासरे आहेत तर दुसरा मृतदेह शोभा देवी यांचा असून ती सासू आहे. 

पोलिसांनी सध्या दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून पुढील कारवाई केली जात आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक तैनात केले आहे.