उद्योगपती राहुल बजाज यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांचं उत्तर

आर्थिक विकासाची विस्कटलेली घडी आणि उत्पादन क्षेत्राचा घसरलेल्या विकास दराच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मोदी सरकारला खडेबोल सुनावले.

Updated: Dec 2, 2019, 05:45 PM IST
उद्योगपती राहुल बजाज यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांचं उत्तर title=

नवी दिल्ली : आर्थिक विकासाची विस्कटलेली घडी आणि उत्पादन क्षेत्राचा घसरलेल्या विकास दराच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मोदी सरकारला खडेबोल सुनावले. त्याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. 

केंद्र सरकार टीका आणि प्रश्नांचं नेहमीच स्वागत करतं आणि वेळोवेळी त्याला उत्तरही दिलं जात, असा दावा सीतारामण यांनी केला आहे. तसंच राष्ट्रहिताला मारक ठरेल असं काही करू नये, असा सल्लाही सीतारामण यांनी राहुल बजाज यांना दिला आहे. 

पीएमसीबँक खातेदारांसाठी महत्वाची बातमी

पीएमसीबँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली. ताब्यात घेतलेल्या प्रमोटर्सच्या मालमत्ता आर बी आयला दिल्या जातील. त्या मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेधारकांना दिले जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या.