Assembly Election Results 2017

कोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

 बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

प्रशांत जाधव | Updated: Jun 19, 2017, 08:05 PM IST
 कोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

मुंबई  :  बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

मात्र विरोधकांच्या उमेदवारासंदर्भात सोनिया गांधी आणि लालू यादव यांच्याशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर दुसरीकडे कोविंद दलित असल्यामुळं त्यांच्या उमेदवारीला विरोध करणार नाही. 

मात्र त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावशाली उमेदवार असला तर त्याला पाठिंबा देणार असल्याची भूमिका बसपा अध्यक्षा मायावतींनी घेतलीय.

सेनेचा निर्णय दोन दिवसात...

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

कोविंद यांच्या नावाबाबत शाह यांनी उद्धव यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचंही राऊत म्हणालेत. 

 

काँग्रेस २२ जूनला निर्णय घेणार....

राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे. 

त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यावेळी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करायचा, याचा निर्णय घेतला जाईल असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. 

त्याच वेळी नावावर आधी चर्चा केली जाईल, हे आश्वासन भाजपानं पाळलं नसल्याची टीकाही आझाद यांनी केलीये. 

 

भाजपकडून कोविंद यांचे नाव... 

राष्ट्रपतीपदाच्या नाव निश्चितीसाठी आज झालेल्या  भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल  रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कोविंद हे दलित समाजाचे आहेत. ते मुळचे कानपुर, उत्तर प्रदेशचे आहेत. मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे दिग्गज नेते उपस्थित होते. 

या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना देण्यात आले होते.