नितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

ANI | Updated: May 30, 2019, 07:24 PM IST
नितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही! title=

 नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी शपथ घेण्याआधीच एनडीएचा घटक पक्ष नाराज असल्याचे वृत्त हाती आले आहे. जेडीयू मोदी मंत्रिमंडळात सभागी होणार नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, आपला पक्ष एनडीएचा एक भाग राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीत जेडीयूने १६ जागा जिंकल्या आहेत. जेडीयूला केवळ एकच मंत्रीपद देण्याचे भाजपने निश्चित केल्याने नितीश कुमार कमालीचे नाराज झालेत. त्यांनी मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मोदी सरकारला पहिला झटका बसला आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, याची माहिती भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही एनडीएसोबत आहे, पण सरकारमध्ये नाही. त्यामुळे आमच्यावर कोणतेही बंधन नाही.आम्हाला एका मंत्रीपदाची गरज नाही. ही एक मोठी समस्या नाही, आम्ही पूर्णपणे एनडीएमध्ये आहोत आणि आम्ही नाराज नाही. आम्ही एकत्र काम करत आहोत, असेही ते म्हणालेत.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाल आहे. त्यांनी पंतप्रधान पदाची गुरुवारी शपथ घेतली. अमित शाह, ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही पुन्हा संधी देण्यात येत आहे.