आता या ओळखपत्रांशिवाय एअरपोर्टवर प्रवेश नाही

विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा ब्यूरोने विमानतळावरील प्रवेशासाठी 10 ओळखपत्र अनिवार्य केले आहेत. ओळखपत्रांचा संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी ब्यूरोने ही माहिती दिली आहे.

Updated: Oct 28, 2017, 01:12 PM IST
आता या ओळखपत्रांशिवाय एअरपोर्टवर प्रवेश नाही title=

मुंबई : विमानतळावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा ब्यूरोने विमानतळावरील प्रवेशासाठी 10 ओळखपत्र अनिवार्य केले आहेत. ओळखपत्रांचा संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी ब्यूरोने ही माहिती दिली आहे.

 
आता ओळखपत्र दाखवूनच विमानतळ टर्मिनलमध्ये दाखल होता येणार आहे. चेक इनसाठी देखील ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. नागरी विमान वाहतूक ब्युरोने प्रवेशासाठी हे कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
 
1. पासपोर्ट
2. मतदार आयडी
3. आधार किंवा मोबाईल-आधार
4. पॅन कार्ड
5. वाहनचालक परवाना
6. सर्विस आयडी
7. विद्यार्थी आयडी कार्ड
8. राष्ट्रीयकृत बँकेच्या छायाचित्रयुक्त पासबुक
9) पेन्शन कागदपत्रासह पेन्शन कार्ड किंवा फोटो
10. दिव्यांग प्रमाणपत्र किंवा दिव्यांग मेडिकल प्रमाणपत्र
 
सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी ब्युरोचे प्रमुख कुमार राजेश चंद्र यांनी सांगितले की, अशी प्रणाली देखील विकसीत केली गेली आहे की जर कोणाचंही ओळखपत्र हरवले तर तो आपली ओळख सिद्ध करून प्रवेश मिळवू शकेल. राजेश चंद्र म्हणाले की, "जर वाजवी कारणांमुळे एखादा प्रवासी वैध कागदपत्रे दाखवू शकत नसेल, तर केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या लेटरहेडवर फोटो असलेला प्रमाणपत्र देखील चालेल.