पुन्हा सरकारकडून स्पष्टीकरण, ‘बिटकॉइनच्या भानगडीत पडून नका’!

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा व्हर्चुअल करन्सीवर अलर्ट जारी केलाय. त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलंय की, बिटकॉइन व्हर्चुअल करन्सीसाठी कोणतही लीगल टेंडर नाहीये. 

Updated: Dec 29, 2017, 09:22 PM IST
पुन्हा सरकारकडून स्पष्टीकरण, ‘बिटकॉइनच्या भानगडीत पडून नका’! title=

नवी दिल्‍ली : अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा व्हर्चुअल करन्सीवर अलर्ट जारी केलाय. त्यांच्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलंय की, बिटकॉइन व्हर्चुअल करन्सीसाठी कोणतही लीगल टेंडर नाहीये. 

मंत्रालयाने सांगितले की, ‘बिटकॉइनचा कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅसेट्ससोबत देणं-घेणं नाहीये. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे खूपच धोकादायक’.

‘सर्वसामान्यांनी यात गुंतवणूक करू नये’

मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, ‘भारतासहीत जगभरात बिटकॉइनसारख्या व्हर्चुअल करन्सी वेगाने वाढत आहेत. अशा व्हर्चुअल करन्सीची व्हॅल्यू नसते. यामुले बिटकॉइनच्या किंमतीमध्ये उतार-चढाव येतात. बिटकॉइनसारख्या व्हर्चुअल करन्सीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे. हे त्या स्कीमसारखं आहे ज्यात तुम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतो’. 

‘व्हर्चुअल करन्सीला सरकारचा पाठिंबा नाही’

‘व्हर्चुअल करन्सीला सरकार कोणत्याही प्रकारचं पाठिंबा देत नाही. बिटकॉइन सारख्या करन्सीचं लीगल टेंडर नाहीये. त्यामुळे ही करन्सी नाहीये. ही करन्सी कॉइनसारखी सांगितली जात आहे. पण या कॉइनची कोणतीही फिजिकल व्हॅल्यू नाहीये. सरकार किंवा रिझर्व्ह बॅंक कोणत्याही व्हर्चुअल करन्सीच्या देवाणघेवाणीला परवानगी देत नाही’.

‘करन्सी हॅक होण्याचा धोका’

मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की, ‘बिटकॉइनमध्ये गुंतवणूक धोकादायक आहे. जी करन्सी डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये ठेवली जाते, ती हॅक होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. रिझर्व्ह बॅंक आणि सेबी एकत्र येऊन व्हर्चुअल करन्सीसाठी नियम तयार करण्याच्या तयारीत आहे. पण अजून यावर काहीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीये’.