खाली येण्याऐवजी 25 व्या मजल्याचे छत तोडून लिफ्ट बाहेर, 3 जण गंभीर जखमी

एका इमारतीत विचित्र आणि धक्क्दायक अपघात घडला. लिफ्टमध्ये खाली जाण्यासाठी बटन दाबलं आणि ती थेट 25 व्या मजल्याचे छत तोडून बाहेर गेली. 

नेहा चौधरी | Updated: May 13, 2024, 02:17 PM IST
खाली येण्याऐवजी 25 व्या मजल्याचे छत तोडून लिफ्ट बाहेर, 3 जण गंभीर जखमी  title=
Noida Lift Accident elevator exited through the roof of the 25th floor seriously injuring 3 people

Noida Lift Accident : शहरांमध्ये उंच उंच इमारती असल्याने तिथे लिफ्टची व्यवस्था करण्यात येते. या लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना दररोज समोर येत असतात. पण दिल्लीजवळील नोएडामध्ये सेक्टर 137 मध्ये एक विचित्र आणि धक्कदायक अपघात घडला. पारस टायरा सोसयटीमध्ये रविवारी या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 

खाली येण्याऐवजी 25 व्या मजल्याचे छत तोडून...

झालं असं की पारस टायरा सोसायटीमध्ये दोन महिला आणि एक पुरुष लिफ्टमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. इमारतीच्या टॉवर-5 च्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट असताना त्यात तिघांनी प्रवेश केला. त्यांनी खाली जाण्यासाठी लिफ्टचं बटण दाबलं पण लिफ्टचे ब्रेक अचानक निकामी झाले. पुढच्या क्षणी लिफ्ट मोठ्या वेगाने वरच्या दिशेने गेली. 25 व्या मजल्याला लिफ्ट धडकताच ती छताला तोडून बाहेर निघाली. या घटनेत तिघंही जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु आहेत. 

काही दिवसांपूर्वी इमारतीतील लिफ्ट अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना या घटनेने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेनंतर इमारतीतील दोन्ही लिफ्ट बंद करण्यात आले आहेत. तर नियमित देखभालीअभावी लिफ्टमध्ये बिघाड झाल्याचा आरोप इमारतीतील नागरिकांनी केलाय. पोलीस या प्रकणात तपास करत असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय.