नोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी

पोलिसांची कंपन्यांना नोटीस

Updated: Dec 25, 2018, 05:48 PM IST
नोएडामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बाजुलाच असलेल्या नोएडामध्ये पोलिसांनी नवाज अदा करण्याविषयी एक सूचना जाहीर केली आहे. नोएडा पोलिसांनी एका कंपनीला नोटीस पाठवली आहे की, जर पार्कमध्ये नवाज अदा करण्यावर रोख लावण्यात आली नाही तर यासाठी कंपनीला जबाबदार धरण्य़ात येईल.

पोलिसांनी म्हटलं की, जर पार्कमध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिक आयोजन केलं तर यासाठी परवानगी घ्यावी लागेल. नोएडाचे एसएसपी अजय पाल यांनी म्हटलं की, अनेक जण पार्कमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी मागतात. पण सिटी मॅजिस्ट्रेट ऑफिसमधून यासाठी परवानगी नाही. तरी देखील येथे काही लोकं नमाज अदा करताना दिसले. यामुळे सगळ्या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ही बंदी फक्त एकाच धर्माविषयी आहे असं नाही. या पार्कमध्ये आजुबाजुच्या कंपनीतले अनेक जण येतात. दुपारच्या वेळी येथे नमाज अदा केली जाते. 

नोएडा पोलिसांचं म्हणणं आहे की, हे पाऊल यासाठी उचलण्यात आलं कारण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या कोणतीही सांप्रदायिक तणाव किंवा हिंसा होऊ नये. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आम्हाला आशा आहे की लोकं आम्हाला सहकार्य करतील.