रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे

Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 15, 2023, 07:37 PM IST
रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे title=
old lady gives english classes although she begs on road know her interesting story

Old Poor Lady English Special : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.  त्यामुळे या व्हिडीओची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्याला कायमच असंच वाटतं असतं की रस्त्यावर राहणारे गोरगरीब लोकांना काय बरं इंग्लिंश येत असेल परंतु सध्या यावेळी अशाच एका रस्त्यावरच कैक वर्ष राहणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

ज्यात या एक वयोवृद्ध महिला या चक्क फाडफाड इंग्रजीमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर आपण अनेकदा अशा काही व्हिडीओज मधून पाहतो की हल्ली रस्त्यावरील गरीब लोकंही अगदी अस्खलित इंग्रजीमध्ये बोलताना दिसतात. त्यामुळे कदाचित तुम्हाला वाटेल की यावेळीही नक्की असंच काहीतरी असावं... परंतु थांबा असं काहीच नाहीये. 

हेही वाचा : शेवंतानं पहिल्यांदाच सांगितला तेजश्रीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली, 'असुरक्षितता आणि मत्सर...'

तर यावेळी व्हिडीओतून दिसणारी ही बुजूर्ग महिला ही चक्क फाडफाड इंग्रजीत तर बोलताना दिसतेच आहे परंतु ती यावेळी इंग्रजीत एवढी तल्लख कशी याचीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला या महिलेची नक्की कहाणी कळली तर तुम्हालाही तिच्याबद्दल दया वाटल्याशिवाय राहणार नाही. ही महिला भारतीय नव्हती. ती परदेशातून आली होती. बुर्मा येथून ही महिला आली होती. या महिलेचे नावं आहे मार्लिन. या आपल्या देशात एक इंग्रजी टीचर होत्या. त्याचा खूप मोठा परिवार होता. परंतु त्यांच्यासोबत एक घटना घडली आणि त्या एकट्या पडल्या त्यातून त्यांचे लग्नही झाले होते. परंतु त्यांच्या परिवारातील सर्वच सदस्य हे मृत्यूमुखी पडले त्यामुळे त्या फारच एकट्या पडल्या. परंतु त्या येथे भारतात आल्या त्या इथे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आहेत. परंतु त्या सोशल मीडियावरून जगाला ज्ञान देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

@englishwithmerlin या नावानं त्या आपलं इन्टाग्राम पेज चालवतात. त्याचसोबत यावेळी चर्चा आहे ती म्हणजे एका मुलाची. त्याला या आजी भेटल्या आणि त्यानं हा नवा प्रयोग सुरू केला आहे. ज्याला नेटकऱ्यांनी तूफान प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर ही चांगलीच चर्चा रगंलेली पाहायला मिळते आहे. abrokecollegekid नावाचा इन्टाग्राम युझर त्यांच्याशी बोलतो आणि भेटतो. त्यांच्या दोघांचे व्हिडीओज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.