वडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल

Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल. 

Updated: Nov 30, 2022, 03:11 PM IST
वडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल title=
old man Dances with daughter video goes viral

Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल. लहानपणापासूनच मुली मोठ्या होताना त्यांच्या पहिल्या मित्रापासून ते त्यांच्या पहिल्या सुपरहिरोपर्यंत हे वडीलच त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. बरं वडिलांच्या बाबतीतसुद्धा तेच. लेक म्हणजे जीव, असं म्हणणारे तुमचेही बाबा असतील. अशा या ला़डक्या बाबांसोबत तुम्ही कधी बेभान डान्स केलाय का? नसेल केला, तर हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही किमान एकदातरी वडिलांना तो दाखवाल आणि म्हणाल बघा किती छान नाचताहेत ते.... (old man Dances with daughter video goes viral )

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एक अफलातून व्हिडीओ 

2018 मध्ये एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये एक काका सफारी लूकमध्ये दिसत होते. डोक्यावर पगडी आणि तरुणांनाही लाजवतील असे डान्स मूव्ह्ज अशी दृश्य या Video मध्ये पाहायला मिळालं. पत्नीसोबतचा त्यांचा सुरेख डान्स त्यावेळी प्रचंड गाजला होता. तेच काका आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

हेसद्धा वाचा : मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार 

निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा आणखी एक व्हिडीओ 
गिताना सिंग या इन्स्टाग्राम (instagran) युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. #fatherdaughterdance असा हॅशटॅगही तिनं या व्हिडीओमध्ये जोडला आहे. जो पाहता तिच्यासोबत ठेका धरणारे आणि पुन्हा एकदा तरुणाईला थिरकायला भाग पाडणारे हे तिचे बाबाच असल्याचं लक्षात येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून बऱ्याचजणांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gitana Singh (@gitanasingh)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Zora Khan (@dr.zora)

वडील मुलीच्या या जोडीला सध्या प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, नाचण्यासाठी वयाचं भान नसतं हेच सिद्ध करणाऱ्या या काकांना अनेकजण सलाम ठोकत आहेत. बरं इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत नाचणाऱ्या लाडक्या लेकीवरही नेटकरी आणि विशेष म्हणजे तरुण मंडळी जीव ओवाळून टाकत आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?