हवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी

पाकिस्तानला भारतीय हवाई दलाचं प्रत्युत्तर

Updated: Oct 4, 2019, 01:45 PM IST
हवाई दलाकडून बालाकोट एयर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : २६ फेब्रुवारी २०१९ रोजी हवाई दलाच्या १२ मिराज २००० जेट्सने नियंत्रण रेषा पार करत बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी चौक्यांवर हल्ला करत त्यांचा खात्मा केला. या हल्ल्यादरम्यान जवळपास २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले. आता भारतीय वायु सेनेकडून या हल्लाबाबत एक प्रमोशनल  व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. 

८ ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याआधी वायु सेना प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरियाद्वारे, पत्रकारपरिषदेत  एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये बालाकोट हवाई हल्ल्याची कहाणी दाखवण्यात आली.

यावेळी बोलताना, भारतीय हवाई दल कोणत्याही आपतकालीन स्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचे वायुसेना प्रमुख राकेश सिहं भदौरिया यांनी सांगितले. तसेच भारतीय हवाई दलाच्या मोहिमेची तयारी मोठ्या स्तरावर करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात हवाई दलाकडून अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली गेली असल्याचेही ते म्हणाले.