केरळ: ओणम सणावर दु:खाची छाया

राज्यभरात सण न साजरा करण्याचीच लोकांमध्ये मानसिकता आहे. पण काही रिलीफ कॅम्प मध्ये अगदी साधेपणाने सण साजरा होणार.

अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 25, 2018, 01:04 PM IST
केरळ: ओणम सणावर दु:खाची छाया title=

कोच्ची: केरळमध्ये ओणम सण अतिशय महत्त्वाचा. मात्र, महापुरामुळे यंदा ओणम सणावर दु:खाचं सावट पसरलंय. राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सण यंदा काही रिलीफ कॅम्पमध्येच अगदी साधेपणानं साजरा केला जाणार आहे. पुरामुळे राज्यातील ७ हजार घरं पूर्णपणे उद्धवस्त झालीत तर ५० हजार घरांचं मोठं नुकसान झालंय.

 २६.६लाख घरांपैकी २३.३६ घरांमधील वीज पुरवठा पूर्ववत

दरम्यान, केरळमध्ये २६.६लाख घरांपैकी २३.३६ घरांमधील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. सरकारकडून पूरग्रस्तांना १० हजारांची आर्थिक मदत जाहिर करण्यता आलीये. तर घर दुरुस्तीसाठी ५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. लघुउद्योजकांना सरकार १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, आता सरकारपुढं सर्वात मोठं आव्हान आहे ते पुरानंतर निर्माण झालेला कचऱ्याचं, प्लास्टिक वस्तू आणि बिघडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विघटनाचं. त्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्यत.

केरळमधील सध्यस्थितीबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे

  • केरळात आज पारंपारिक सण ओणम, पण पुरानंतर उत्साहाच्या जागी खिन्नता.
  • राज्यभरात सण न साजरा करण्याचीच लोकांमध्ये मानसिकता आहे. पण काही रिलीफ कॅम्प मध्ये अगदी साधेपणाने सण साजरा होणार.
  • सरकार घर दुरुस्तीसाठी ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार.
  • सरकारकडून पूरग्रस्तांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत.
  • पुनर्वसन मोहिमेअंतर्गत आयटी बेस कंपनीच्या माध्यमातून नुकसान झालेली घरं आणि दुकानांची नेमकी संख्या आणि त्यांचं नेमकं नुकसान निश्चित करणार.
  • ७ हजार घरं पूर्णपणे उध्वस्त आणि ५० हजार घरांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.
  • मदत छावण्यांची संख्या घटली. २२५७ मध्ये उरले २.१८ लाख पूरग्रस्त आश्रित.
  • खंडित झालेल्या २५.६ लाख घरांपैकी २३.३६ घरांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत. पुरात बंद पडलेल्या १६ हजार १५८ पैकी १४ हजार ३१४ पुन्हा ट्रान्सफॉर्मर सुरु.