पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

गेल्या वर्षात ११ लाख ४४ हजार पॅनकार्ड रद्द करण्यात आले होते.

Updated: Feb 13, 2019, 01:19 PM IST
पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया  title=

नवी दिल्ली - पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेत सरकारने मुदतवाढ केली आहे. तसेच पॅनकार्डला आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०१९ ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. ही प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण न केल्यास संबधित व्यक्तीचे पॅनकार्ड रद्द करण्यात यईल. पॅनकार्ड हे महत्वाचे कागदपत्रे म्हणून वापरले जाते. बॅंकेमध्ये खाते उघण्यासाठी, अर्थिक देवाण- घेवाण करण्यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर शॉपिंग करतानाही पॅनकार्ड अनिवार्य असल्याचे सरकारने घोषणा केली होती. सरकारकडून गेल्या वर्षात ११ लाख ४४ हजार पॅनकार्ड रद्द करण्यात आले होते. ऑनलाईन पॅनकार्ड लिंक करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा.

ऑनलाइन प्रक्रिया 
 
- आयकर विभागाच्या ई-फाईल वेबसाईट (www.incometaxindiaefiling.gov.in) वर जा. 
- वेबसाइटवर 'लिंक आधार' एक पर्याय दिसेल, येथे क्लीक करा. 
- लॉगईन केल्यानंतर आपल्या खात्यावरील प्रोफाइल सेटिंगमध्ये प्रवेश करा.
- प्रोफाईल सेटिंगमध्ये आपल्याला आधार लिंक करण्याचा पर्याय निवडा.
- येथे दिलेल्या विभागामध्ये आपला आधार नंबर भरा. 
- माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या आधारलिंक पर्यायवरच्या बटणावर क्लीक करा. यानंतर आपले पॅनकार्ड आधारशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.  

मागील वर्षी सरकारने करदात्यांना आयकर परतावा भरण्यासाठी पॅनकार्ड आधारशी जोडण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यात मुदतवाढ करण्यात आली होती. मार्च २०१८ पर्यंत आपले पॅनकार्ड आधारशी जोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायलायाकडून या मुदतीत वाढ करुन ३१ ऑगस्ट २०१८ ही अंतिम तारीख ठरवली होती. पुन्हा या तारखेत बदल करण्यात आला असून, ३१ मार्च ही शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगितले जात आहे.