पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

घोषणा केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 25, 2018, 10:39 PM IST
पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर title=

नवी दिल्ली : घोषणा केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.

महाराष्ट्रातील अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. अभय बंग, राणी बंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संपत रामटेके यांना यांना मरणोत्तार पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

एक नजर टाकूयात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना 'पद्मश्री' पुरस्कार

डॉ. अभय बंग आणि राणी बंग (आरोग्य)

अरविंद गुप्ता (वैज्ञानिक)

लक्ष्मीकुट्टी (जंगल दीदी)

भज्जू श्याम (गोंड कलाकार)

सुधांशू विश्वास (सामाजिक कार्यकर्ते) 

संपत रामटेके (सामाजिक कार्यकर्ते) 

एम. आर. राजगोपाल (आरोग्य)

मुरलीधर पेटकर (क्रीडा)

राजगोपालन वासुदेवन (संशोधन)

सुहासिनी मिस्त्री (सामाजिक कार्यकर्ते)