विंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास?

पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.  

ANI | Updated: Mar 2, 2019, 08:06 PM IST
विंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास? title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदर यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरु केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानचे रंग उघड झाले आहेत. खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानात आपला शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, असे अभिनंदन यांनी सांगितले. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला. त्यामुळे त्यांना उशीर झाला. त्यातूनच पाकिस्तानी सैन्याची खरी वागणूक दिसून येत आहे.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई हल्ल्याच्यावेळी विग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ विमान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्याआधी सैनिकांनी आणि नागरिकांनी त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. तसेच पाकिस्तानात त्यांचा मानसिक छळ करण्यात आलाची माहिती, एएनआयने दिली आहे. दरम्यान, अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने भारताकडे सोपवले. त्यांना पाच वाजता भारताच्या ताब्यात देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, कागदपत्र तपासण्याच्या नावाखाली जबरदस्तीने व्हिडिओ तयार करुन घेतला. ही पाक सैन्याची वाईट पुढे आली आहे.

अभिनंदन यांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि भारतीय वायुदल प्रमुख बी. एस. धनुआ यांनी आज भेट घेतली. पाकिस्तानात नेमके काय घडले, याबाबतची सविस्तर माहिती अभिनंदन यांनी यावेळी संरक्षणमंत्री आणि वायुदलप्रमुखांना दिली. दरम्यान, आज सकाळी नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयात अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात त्यांच्यावर सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.