माणसांनाच नाही तर 'या' पोपटांना देखील लागली अफूची लत

पक्ष्यांना देखील अफूची लत लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 02:38 PM IST
माणसांनाच नाही तर 'या' पोपटांना देखील लागली अफूची लत  title=

प्रतापगड : पक्ष्यांना देखील अफूची लत लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

माणसाला मोठ्या प्रमाणात हानीकारक असलेला अफू आता पक्ष्यांना देखील आपलं शिकार करत आहे. गोष्ट थोडी विचित्र आहे पण खरी आहे. राजस्थानच्या प्रतापगडावरील ही गोष्ट आहे. इथे पोपटांना अफूच्या नशेची सवय झाली आहे. आणि अफूची सवय असतेच तशी की जर ही सवय एकदा लागली तर ती सवय मोडणे कठिण आहे. लक्षात असं आलंय की पोपट अफूचे दाणे खाताना दिसत आहे. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पडत आहे. 

इथले पोपट आहेत अफूच्या नशेत 

प्रतापगडावर अफूची शेती होते. तेथील शेतकऱ्यांना सध्या पोपटांचा अधिक त्रास होत आहे. इथले पोपट चक्क अफूच्या शेतीची नासाडी करत आहे. असंख्य पोपट इथे अफू खात असताना आपल्याला दिसतात. इथल्या पोपटांना या अफूची सवय झाल्यामुळे पोपट त्याचे आधीन गेले आहेत. 

शेतकऱ्यांना त्रास होतोय नशेत असलेल्या पोपटांचा 

हिंदू धर्मात पोपटाला पंडित मानलं जातं. पोपटाला पाळल्यावर, त्याची सेवा केल्यावर घरात सुख - समृद्धी येते. मात्र आता हे पंडित पोपट नशेत असतात. आणि याचा फटका साऱ्यांनाच बसत आहे. नशेत असलेल्या या पोपटांना अजिबात शुद्ध नसल्याचं देखील समोर आलं आहे. माणसांप्रमाणे पोपट देखील या अफूच्या आधीन गेले आहेत.