सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त

डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय. 

Updated: Jun 1, 2018, 09:27 AM IST
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त title=

मुंबई : डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय. याआधी पेट्रोलच्या दरात ३० मेला १ पैसे आणि ३१ मेला ७ पैशांची घसरण झाली होती. गेल्या तीन दिवसांत पेट्रोलच्या दरात एकूण १४ पैशांची कपात करण्यात आलीये. शुक्रवारी डिझेल ५ पैशांनी स्वस्त झाले. याआधी डिझेलच्या दरात ३०मेला १ पैसे आणि ३१ मेला ५ पैशांची कपात झाली होती. याप्रमाणेच गेल्या तीन दिवसांत डिझेलच्या दरात ११ पैशांची कपात झाली. 

सरकारी तेल कंपन्याकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, दिल्लीत आता पेट्रोलचे दर ७८.२९ रुपये प्रती लीटर धालेत. तर डिझेलचे दर ६९.२० रुपये प्रती लीटर झालेत. इंधनाच्या किंमती राज्यातील स्थानिर करांच्या हिशोबाने बदलत असतात. सर्व मेट्रो शहरे आणि इतर राज्यांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत सर्वात कमी किंमत आहे. 

महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती

दिल्ली - 78.29 रुपये प्रति लीटर
कोलकाता -  80.92 रुपये प्रति लीटर
मुंबई - 86.10 रुपये प्रति लीटर
चेन्नई - 81.28 रुपये प्रति लीटर

महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती

दिल्ली - 69.20 रुपयेप्रति लीटर
कोलकाता -  71.75 रुपये प्रति लीटर
मुंबई - 73.67 रुपये प्रति लीटर
चेन्नई - 73.06 रुपये प्रति लीटर