Petrol Price : ११ रुपयांनी महागलं पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ

सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ 

Updated: Jan 23, 2021, 08:44 AM IST
Petrol Price : ११ रुपयांनी महागलं पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ  title=

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या दर आता बेलगाम (Petrol- Diesel Price Today) झाल्याचं दिसत आहेत. दिल्लीतील पेट्रोलच्या दराने उंची गाठली आहे. डिझेल देखील ७६ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतही डिझेलच्या दराने देखील एक उच्चांक गाठला आहे. आज दुसरा दिवस आहे जेव्हा लागोपाठ पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

६ जानेवारी २०२१ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. कोरोना व्हॅक्सीनमुळे जगभरात हालचाली सुरू असताना आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामुळे कच्चा तेलाच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर पडत आहे. पुढील दिवसात दरांत दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली आहे. 

गेल्यावर्षी ११ रुपये पेट्रोल तर ८ रुपयांनी डिझेल महागलं 

जानेवारी महिन्यात पेट्रोलचा दर हा १.९९ रुपयांनी प्रती लिटरमागे वाढलं आहे. १ जानेवारीत दिल्लीत पेट्रोलचे दर ८३.७१ रुपये प्रती लीटर होते आता दर ८५.७० रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर आतापर्यंत २.०१ रुपयांनी महागलं आहे. १ जानेवारी रोजी दिल्लीत डिझेलचे दर ७३.८७ रुपयांनी प्रती लीटर होते आता हे दर ७५.८८ रुपये आहेत. 

४ मेट्रो शहरांत पेट्रोलचे दर  

शहर             कालचा दर   आजचा दर                
दिल्ली            ८५.४५        ८५.७०      
मुंबई             ९२.०४        ९२.२८
कोलकाता         ८६.८७        ८७.११         
चेन्नई            ८८.०७        ८८.२९ 

४ मेट्रो शहरांत डिझेलचे दर  

शहर             कालचा दर   आजचा दर                
दिल्ली            ७५.६३        ८५.८८      
मुंबई             ८२.४०        ८२.६६
कोलकाता         ७९.२३        ७९.४८     
चेन्नई            ८०.९०        ८१.१४