पेट्रोलच्या दरानं गाठला दोन वर्षांतील उच्चांकी आकडा

पाहा कोठे आहेत सर्वात कमी दर... 

Updated: Dec 7, 2020, 07:46 AM IST
पेट्रोलच्या दरानं गाठला दोन वर्षांतील उच्चांकी आकडा  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सातत्यानं सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या पेट्रोल petrol डिझेलच्या disel दरांनी  rates prices पुन्हा एकदा अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 28 आणि 29 पैशांनी वाढवल्या आहेत. परिणामी बहुतांश शहरांमध्ये दराच्या आकड्यानं नव्वदी ओलांडली आहे. 

मुंबईत Mumbai पेट्रोलचे  दर 90.05 तर, डिझेल 80.05 रुपये प्रतिलीटर दरानं विकलं जात आहे. पोर्ट ब्लेअर येथे पेट्रोल सर्वाधिक कमी म्हणजेच 70.23 रुपये प्रतिलीटर इतक्या किमतीला मिळत आहे. दरम्यान सातत्यानं होणारी दरवाढ आणि त्यामुळं अनेकांवर येणारा आर्थिक बोजा पाहता काँग्रेसकडून या इंधन दरवाढीत सत्ताधाऱ्यांनी लक्ष देत दरवाढीत दिलासा द्यावा अशी मागणी केल्याचं कळत आहे. 

जवळपास दोन वर्षांच्या काळात पेट्रोलच्या दरांनी गाठलेला हा उच्चांकी आकडा अनेकांनाच घाम फोडत आहे. 

 

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सरकारकडून हे दर स्थिर ठेवण्यात आले होते. पण, जून महिन्यापासून ही दरवाढ सुरु झाली. पुढं, 22 सप्टेंबरपासून स्थिर असणारी ही दरवाढ 20 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु झाली. परिणामी दरांचा वाढता आकडा सारी गणितं बदलून गेल्याचं पाहायला मिळालं.