Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर?

पेट्रोलच्या दराचा सामान्यांवर परिणाम 

Updated: Jan 5, 2021, 07:51 AM IST
Petrol Price : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेलचे दर? title=

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या (Petrol, Diesel) च्या दरात आज २९ व्या दिवशी कोणतेही बदल झालेले नाहीत. या अगोदर पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत ६ दिवस वाढ झाली होती. आज तेल मार्केटिंग कंपन्यांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

या अगोदर पेट्रोल, डिझेलचे दर एकूण ४८ दिवस बदलले नव्हते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून दरात वाढ पाहायला मिळाली. यानंतर तब्बल १७ वेळा दरात वाढ झाली. मार्च महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये डिझेलच्या किंमतीत कपात पाहायला मिळाली. तेव्हा तेल मार्केटिंग कंपन्यांनी ८२ दिवसांपर्यंत काहीच बदल केले नव्हते. कारण वाढलेली एक्साइज ड्यूटीला तेलच्या घसरण झालेल्या दराशी तडजोड करायची होती. 

4 मेट्रो शहरांत Petrolचे दर

शहर             आजचा दर   

दिल्ली           ८३.७१      
मुंबई            ९०.३४ 
कोलकाता        ८५.१९
चेन्नई           ८६.५१          

याचप्रकारे डिझेलच्या रेट दरात कपात झालं आहे. दिल्लीमध्ये डिझेल आजचा दर ७३.८७ रुपये प्रति लीटर विकलं जात आहे. मुंबईत डिझेलचा दर ८०.५१ प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये डिझेलच्या दरात बदल झालेला नाही तो ७७.४४ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत डिझेल ७९.२१ रुपये प्रति लीटर आहे. 

4 मेट्रो शहरांत डिझेलचे दर

शहर            आजचा दर 

दिल्ली           ७३.८७
मुंबई            ८०.५१
कोलकाता        ७७.४४
चेन्नई           ७९.२१

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. 

बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.