PM आवास योजनेबाबत सरकारचे नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा मोठं नुकसान

PM Awas Yojana: PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

Updated: Feb 8, 2022, 12:34 PM IST
PM आवास योजनेबाबत सरकारचे नवीन नियम; जाणून घ्या अन्यथा मोठं नुकसान  title=

नवी दिल्ली: PM Awas Yojana: PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे वाटप झाले असेल, तर त्यामध्ये पाच वर्षे राहणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे वाटप रद्द केले जाईल. ज्या घरांचे नोंदणीकृत करारनामे भाडेतत्त्वावर दिले जात आहेत किंवा ज्या लोकांना भविष्यात हा करार करून दिला जाईल त्यांना नोंदणीची गरज नाही.

पीएम आवास अंतर्गत नियमांमध्ये बदल

तुम्ही या घरांचा वापर केला की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. तुम्ही राहात असाल तर हा करार लीज डीडमध्ये बदलला जाईल. अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्याशी केलेला करारही रद्द करेल. यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कमही परत केली जाणार नाही. म्हणजेच आता त्यात सुरू असलेली अनियमितता थांबणार आहे.

फ्लॅट फ्री होल्ड असणार

नियम आणि अटींनुसार, शहरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले फ्लॅट कधीही फ्री होल्ड होणार नाहीत. पाच वर्षानंतरही लोकांना लीजवर राहावे लागणार आहे.  या बदलानंतर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लोकांनी लीजवर घेतलेली घरे इतरांना भाड्याने देणे बंद होऊ शकते.

नियम काय आहेत?

जर एखाद्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर, नियमानुसार, भाडेपट्टा कुटुंबातील सदस्यालाच हस्तांतरित केला जाईल. KDA इतर कोणत्याही कुटुंबाशी कोणताही करार करणार नाही. या करारानुसार, वाटप करणाऱ्यांना 5 वर्षांसाठी घरे वापरावी लागणार आहेत. त्यानंतर घरांचे भाडेपट्टे पूर्ववत केले जातील.