PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्वाची अपडेट; हे काम लवकर करा पूर्ण

PM Kisan Yojana Latest Update: पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यासंबधी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 31 मे रोजी 11 वा हप्ता आल्यानंतर आता पुढील हप्त्याबाबत सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे

Updated: Jul 6, 2022, 10:34 AM IST
PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्वाची अपडेट; हे काम लवकर करा पूर्ण title=

मुंबई : PM Kisan Yojana Latest Update:  पीएम किसान सन्मान निधीच्या बाबतीत ब-याच दिवसांनी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 31 मे रोजी 2000 रुपयांचा 11वा हप्ता पीएम मोदींच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आला. त्यानंतर केवायसी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली. पण आता खात्यात 12 वा हप्ता कधी येणार यासंबधी माहिती समोर येत आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते.

दोन हजार तीन हप्त्यांमध्ये निधी

प्रत्येकी दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शासनाकडून दिली जाते. पहिला हप्ता दरवर्षी 1 एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत पाठविला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पहिला हप्ता (11वा हप्ता) आला आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2022 रोजी मागील वर्षाचा शेवटचा हप्ता खात्यावर पाठविण्यात आला. 

1 सप्टेंबर रोजी पैसे येणे अपेक्षित

आता शेतकरी बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून 1 सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.