PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 12 वा हप्ता, त्याआधी करावे लागणार हे काम

PM Kisan 12th Installment Date 2022 : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? जाणून घ्या.

Updated: Oct 6, 2022, 08:40 PM IST
PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 12 वा हप्ता, त्याआधी करावे लागणार हे काम title=

पीएम किसान योजना : आपल्या देशात आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि पेन्शन यांसारख्या अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनां सरकारकडून सुरु आहेत. या योजनांचा उद्देश गरीब लोकांना याचा फायदा होण्यासाठी आहे. एकीकडे राज्य सरकार आपापल्या राज्यातील जनतेच्या हिताच्या योजना राबवत असताना दुसरीकडे केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी योजना राबवते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्रातर्फे गरीब शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत 11 हप्ते दिले गेले असून प्रत्येकजण 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. (PM Kisan Yojana 12th Installment Status)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार 12व्या हप्त्याचे पैसे कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. अपडेटनुसार, सरकार ऑक्टोबर महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. सरकारने ई-केवायसीसाठी 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, ही मुदत आता संपली आहे. (PM Kisan 12th Installment Date 2022)

OTP आधारित ई-केवायसी अजूनही पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. ज्यांनी केवायसी केले नसेल त्यांनी केवायसी करुन घ्यावे. अन्यथा पैसे अडकू शकतात.

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती टाकली होती. त्यांचे हप्त्याचे पैसेही अडकू शकतात. दुसरीकडे, हप्त्याचे पैसे हस्तांतरित केल्यानंतर, तुम्ही पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्याची स्थिती तपासू शकता.

सरकारने आधीच सांगितले होते की पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नसेल. त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

1. प्रथम अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जा
2. उजव्या बाजूला असलेल्या 'e-KYC' या पर्यायावर क्लिक करा
3. आता 12 अंकी आधार क्रमांक टाका.
4. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट करा. असे केल्याने तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.