5 राज्यांमध्ये निवडणुका, पंतप्रधान मोदींचा महामेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भोपळ दौऱ्यावर

Updated: Sep 25, 2018, 08:57 AM IST
5 राज्यांमध्ये निवडणुका, पंतप्रधान मोदींचा महामेळावा title=

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपळ दौऱ्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत. भोपाळमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज १० लाख कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला आहे.  या सभेसाठी राज्यातल्या २३० मतदारसंघातील ६५ हजार बुथस्तरावरील कार्यकर्ते भोपाळमध्ये दाखल होत आहेत.

5 राज्यात विधानसभा निवडणुका 

येत्या दोन महिन्यात मध्यप्रदेशसह देशातल्या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. निवडणुकीआधी मध्यप्रदेशातलं हे सर्वात मोठं  शक्तीप्रदर्शन असणार आहे. सभेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह सगळे बडे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने 2019 साठी अमित शाह यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोरम आणि तेलंगणा या राज्यात निवडणुका होणार आहे.

लोकसभेची सेमीफायनल

तेलंगणातील सरकार कार्यकाळ संपण्याआधीच बरखास्त करण्यात आलं होतं. त्यामुळे येथेही सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने हे राजस्थान, मिझोरम, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या विधानसभेसाठी आयोजन सुरु केलं आहे. डिसेंबरमध्ये या 5 ही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.