मन की बात : 'द्वेष पसरवणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधीत केले.

Updated: Jul 28, 2019, 02:53 PM IST
मन की बात : 'द्वेष पसरवणाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत' title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील नागरिकांना संबोधीत केले. यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्वाच्या मुद्दांवर भाष्य केले. जलनिती, अमरनाथ यात्रा, चांद्रयान २ प्रक्षेपण त्यानंतर विज्ञान क्षेत्रात वाढत असलेली मुलांची आवड इत्यादी गोष्टींचे महत्व पटवून देत मुलांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारत देशातील जलसंधारणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जलसंधारण हा लोकांचा एक हृदयस्पर्शी विषय आहे. पाण्याच्या  विषयाने सध्या देशातील नागरिक त्रस्त आहेत.

पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. त्यानंतर त्यांनी अमरनाथ यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी काश्मीरच्या नागरिकांची प्रशंसा केली. गेल्या चार वर्षांनंतर यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रेत गेलेल्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे सर्वात जास्त क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थांना श्रीहरिकोटा येथे ७ डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी घेवूण जाणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगीतले. 

त्यानंतर मोदी म्हणाले की 'जीवनात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी हिंमत असायला हवी.' भारताचे १७वे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांसोबत संवाद साधतात.