...जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्याच्या पाया पडतात तेव्हा, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्याच्या पाय का पडले? पाहा व्हिडीओ

Updated: Feb 21, 2022, 08:33 PM IST
...जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्याच्या पाया पडतात तेव्हा, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसोबत खुर्ची सोडून खाली बसतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता त्याच पाठोपाठ आणखी एका व्हिडीओची खूप चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: वाकून भाजप कार्यकर्त्याला नमस्कार करताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा होता आहे. हा व्हिडीओ मनाचा ठाव घेणारा आहे. पंतप्रधान मोदी चक्क एका भाजप कार्यकर्त्याला वाकून नमस्कार करतात हे वाचूनच आपल्याला काहीसं आश्चर्य वाटेल. 

भाजप कार्यकर्ता अवधेश कटियार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीरामाची मूर्ती दिली. यावेळी त्यांनी मूर्ती दिल्यानंतर लगेच त्यांना वाकून नमस्कार केला. एका युजरने याचा व्हिडीओ शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं की केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच कार्यकर्त्याला असा मान देऊ शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्याला नमस्कार करण्याचं कारणही समोर आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या म्हणण्यानुसार श्रीरामाची मूर्ती देणाऱ्याने कधीच स्वत: च्या पाया पडायला सांगू नये. त्यामुळे मोदींनी इशारा करून कार्यकर्त्याला थांबवलं आणि स्वत: त्याला नमस्कार केला. 

कटियार यांचं प्रमोशन करण्यात आलं आहे. ते उन्नाव जिल्ह्याचे महासचिव होते. आता त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उन्नाव इथे एकूण 6 विधानसभेच्या जागा आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय वर्तुळात मोदींनी केलेली ही कृती जनतेचं मन जिंकून घेणारी आहे. याचा फटका विरोधकांना बसणार असल्याची चर्चा आहे.