'या' बाईकवाल्यासमोर पोलीस अधिकाऱ्याने जोडले हात !

सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 10, 2017, 08:42 PM IST
'या' बाईकवाल्यासमोर पोलीस अधिकाऱ्याने जोडले हात ! title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एका बाईकवरील परिवारासमोर पोलीस हात जोडून उभे आहेत. पोलीसांनी हात जोडण्याचे कारण म्हणजे या बाईकवर असलेले पाच लोक. ज्यात दोन लहान मुलं देखील आहेत. आणि कहर म्हणजे त्या व्यक्तीने हेल्मेट देखील घातलेले नाही. 

हा फोटो आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील आहे. कर्नाटर काडरच्या IPS ऑफिसर अभिषेक गोयल यांनी हा फोटो मंगळवारी सोशल मीडियावर  शेअर केला. त्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्याला तीन हजारहून अधिक लोकांनी शेअर देखील केले. 
IPS अधिकारी यांनी फोटो शेअर करत ट्विट केले की, "हे पोलीस अजून काय करू शकतात ? आपल्याकडे नेहमी एक पर्याय असतो... नेहमी सुरक्षित पर्याय निवडा."

इंडियन एक्प्रेसच्या वृत्तानुसार, शुभ कुमार यांनी सांगितले की, या परिवाराला बाईकवर पाहून माझ्या डोक्याने काम करणे बंद केले. मी त्याला त्याच्या परिवाराच्या सुरक्षतेबद्दल विचार करण्यास सांगितले.