पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा

शेतकरी आंदोलनाचे देशभर पडसाद 

Updated: Feb 3, 2021, 02:08 PM IST
पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा title=

मुंबई : पॉर्न स्टार मिया खलीफा (Mia Khalifa) ने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या 'किसान आंदोलन' वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पॉर्न इंडस्ट्रीत अनेक वर्षे काम करून अमेरिकेतील मिया खलीफाने २०१४ मध्ये पॉर्न सिनेमात अभिनयाला देखील सुरूवात केली आहे. दोन महिन्यांतच मिया खलीफा ही सर्वाधिक जास्त पाहिली गेलेली पॉर्न अभिनेत्री बनली आहे. आता मिया खलीफाने शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली असून मोदी सरकारने मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 

मिया खलीफाने असा दावा केला आहे की, केंद्र सरकारने दिल्लीत इंटरनेट देखील बंद केलं आहे.  सोबतच त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोंमधील पोस्टरवर लिहिलं आहे की,'शेतकऱ्यांची हत्या करणं बंद करा.' या अगोदर रिहानाने देखील मोदी सरकारवर निशाना साधत इंटरनेट बंद केल्याचा उल्लेख केला आहे. 

माजी भारतीय क्रिकेटर प्रज्ञान ओझासह अनेक व्यक्तींनी रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग सारख्यांना उत्तर दिलं आहे. प्रज्ञान ओझाने लिहिलं आहे की,'आपला देश शेतकऱ्यांबाबत गर्व करतो. आणि शेतकरी किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, लवकरच त्यांच्या शंकांच निरसन होईल. मात्र, आम्हाला दुसऱ्यांच्या प्रश्नांत पाय घालणाऱ्यांची गरज नाही. हा आमचा खासगी प्रश्न आहे. '